माजी आमदार राजहंस सिंह भाजपमध्ये

Sep 4 2017 5:23PM
मुंबईः कॉंग्रेसचे माजी आमदार आणि मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजहंस सिंह यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. सिंह यांचे उत्तर भारतीय मतदारांवर चांगली पकड आहे. त्यामुळे कॉंग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.