महिलेला "छम्मकछल्लो' म्हणाल तर तुरूंगात जाल

Sep 4 2017 5:43PM
ठाणे ः चेष्टा मस्करतीत अथवा भांडणात महिलांना "छम्मकछल्लो म्हणून संबोधाल तर तुम्ही थेट तुरूंगात जाल! भांडणात एका महिलेला "छम्मकछल्लो असे म्हटल्यामुळे ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने एकाला दोषी ठरवत शिक्षा सुनावली. एक रुपया दंड आणि न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत अटक असे शिक्षेचे स्वरुप होते. सुमारे आठ वर्षांपूर्वीचे हे प्रकरण होते.