म्यानमार सीमेवर भारताची कारवाई; दहशतवाद्याचा खात्मा

Sep 4 2017 6:15PM
नवी दिल्ली ः म्यानमार सीमेवर भारतीय सैन्याने सोमवारी पुन्हा एकदा कारवाई केली. या कारवाईत एनएससीएन (के) संघटनेच्या एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. सैन्याने घटनास्थयावरून रेडिओ सेट आणि शस्त्रसाठाही जप्त केल्याचे समजते. अरुणाचल प्रदेशमधील म्यानमार सीमेवर नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅंड (खापलांग) या प्रतिबंधित संघटनेचे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सैन्याला मिळाली होती. काल सकाळी साडे सातच्या सुमारास कारवाई हाती घेण्यात आली.