संयुक्त राष्ट्राने बोलावली तातडीची बैठक

Sep 4 2017 6:32PM
=न्यूयॉर्क : उत्तर कोरियाच्या अणुचाचणीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राकडून तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या राजदूत निकी हॅले यांनी ट्विटद्वारे बैठकीची माहिती दिली. या ट्विटमध्ये जपान, युके आणि दक्षिण कोरियासह आम्ही सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावल्याचे त्यांनी म्हटले आहे.