सीआरपीएफ पथकावर दहशतवादी हल्ला; चार जवान जखमी

Sep 4 2017 7:05PM
जम्मू : जम्मू काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पथकावर सोमवारी दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये चार जवान जखमी झाले. जम्मू महामार्गावर काजीगुंद परिसरात हा हल्ला झाला. गस्तीवरील सीआरपीएफ पथकावर दहशतवाद्यांनी अचानक ग्रेनेड हल्ला केला. यामध्ये चार जवान जखमी झाले. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.