पाकिस्तानप्रणित दहशतवादाचा ब्रिक्स परिषदेत निषेध

Sep 4 2017 9:52PM
बीजिंग ः ब्रिक्स शिखर परिषदेत पाकिस्तानस्थित दहशतवादावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले. तसेच, लष्कर ए तैय्यबा आणि जैश ए महंमद या दहशतवादी संघटनांचा घोषणापत्रात उल्लेख करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील चीनच्या धरतीवरून पाकिस्तानचा इशारा दिला. ब्रिक्सच्या घोषणापत्रात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करण्यात आला. जगात कुठेही, कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला मंजूर नाही. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचे समर्थन केले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करतानाच 48 व्या परिच्छेदात दहशतवादावर चिंता व्यक्त करण्यात आली.