लाडक्या बाप्पाला आज निरोप

Sep 4 2017 9:53PM
पुणे : गेल्या दहा दिवसांपासून विविध कार्यक्रमांनी रंगलेल्या गणेशोत्सवाची आज (मंगळवारी) विसर्जन मिरवणुकीने सांगता होणार आहे. देखावे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या रेलचालीनंतर मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झाले आहेत. आज सकाळी 10.30 वाजता मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला महापौर सौ. मुक्ता शैलेश टिळक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होईल. सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने विसर्जन मिरवणूक आणखी दिमाखदार निघेल.