पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या; एसआयटी चौकशीचे आदेश

Sep 6 2017 8:59PM
बंगळुरू ः ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची मंगळवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येचा तपास विशेष चौकशी पथकामार्फत केला जाणार आहे. त्यासाठी पोलिस महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष चौकशी पथक स्थापन करण्याचे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले. लंकेश यांचे बंधू इंद्रजित यांनी या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी केली आहे. तर बंगळुरू पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी केली आहेत.