राज्यात 15 जण बुडाले

Sep 6 2017 9:05PM
मुंबई/पुणे ः राज्यात काही ठिकाणी विसर्जन मिरवणूक सोहळ्याला गालबोट लागले. विविध ठिकाणच्या घटनेत 15 जण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पुणे आणि पिंपरीतील प्रत्येकी दोन अशा चौघांचा बुडून मृत्यू झाला. याव्यतिरिक्त औरंगाबादमध्ये तिघे बुडाले. जळगावमध्ये दोघे बुडाले, तर .नाशिक, बीडमध्येही प्रत्येकी एकाचा बुडून मृत्यू झाला.