गोरक्षकाच्या नावाखाली होणारा हिंसाचार रोखण्यासाठी सक्षम अधिकारी नेमा : सर्वोच्च न्यायालय

Sep 6 2017 9:07PM
नवी दिल्ली ः देशात गोरक्षेच्या नावाखाली होणारा हिंसाचार आणि हत्येच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. तसेच केंद्र आणि राज्य सरकारांना चांगलेच धारेवर धरले. कथित गोरक्षकांकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सक्षम अधिकारी नेमण्याचे आदेश राज्य सरकारांना दिले. याचबरोबर वेगवेगळ्या राज्यांनी यासंदर्भात काय कारवाई केली, याचा सविस्तर अहवाल एका आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात सादर करावा, असे आदेशही न्यायालयाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.