सोनिया गांधींचा बेपत्ता कमांडो सापडला

Sep 7 2017 5:51PM
नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात असलेला आणि अचानक बेपत्ता झालेला विशेष सुरक्षा गटातील कमांडो पदपथावर सापडला आहे. गेल्या पाच दिवसांपासून तो उपाशीच होता. तो दिवसभर दिल्लीत भटकायचा आणि रात्री एखाद्या पादचारी मार्गावर झोपायचा. आर्थिक चणचणीमुळे तो घरी आणि कामावरही गेला नसल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. राकेश कुमार असे त्याचे नाव आहे. तो 1 सप्टेंबर रोजी साप्ताहिक सुट्टी असतानाही कामावर आला होता. यावेळी तो सहकाऱ्यांना भेटून निघून गेला. मात्र, जाताना त्याने रिव्हॉल्व्हर आणि मोबाईल नेला नव्हता. तसेच घरीही गेला नव्हता. शिवय तो गणवेशातच होता. त्यामुळे त्याच्या अचानक गायब होण्याचे गुढ वाढले होते.