हिंसा घडवण्यासाठी डेरा सच्चाने दिले पाच कोटी

Sep 7 2017 6:08PM
पंचकुला ः बाबा राम रहीम याच्या शिक्षेचा निकाल न्यायालयाने सुनावताच पंजाब आणि हरयानात हिंसा घडवून आणण्यासाठी डेरा सच्चा सौदाने पाच कोटी रुपये दिले होते, अशी धक्कादायक माहिती विशेष चौकशी पथकाच्या तपासातून उघड झाली आहे. त्यामुळे पंजाब आणि हरयानात झालेली दंगल पूर्वनियोजित असल्याचे उघड झाले आहे.