रेल्वे अपघातांचे सत्र सुरूच

Sep 7 2017 6:20PM
नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेली रेल्वे अपघाताची मालिका सुरूच आहे. उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये शक्तीपुंज एक्सप्रेसचे सात डबे रुळावरून घसरले तर नवी दिल्ली दिल्ली-रांची राजधानी एक्सप्रेसचा एक डबा आणि इंजिन रुळावरून घसरले. सुदैवाने, दोन्ही घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. हावडाहून जबलपूरला निघालेल्या शक्तीपुंज एक्सप्रेसने ओबरा स्थानक सोडताच त्याचे सात डबे घसरले. सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. रेल्वे रुळाला तडे गेल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. हे वृत्त ताजे असतानाच दुपारी बाराच्या सुमारास दिल्लीतील शिवाजी पुलाजवळ रांचीहून दिल्लीकडे निघालेल्या राजधानी एक्सप्रेसचा एक डबा आणि इंजिन रुळावरून घसरले. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही.