पाकिस्तानच्या हबीब बॅंकेला अमेरिकेने ठोकले टाळे

Sep 8 2017 5:58PM
न्यूयॉर्क ः दहशतवादाच्या मुद्दावरून अमेरिकेने पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. अमेरिकेत मागील चार दशकांपासून बॅंकिंग क्षेत्रात असलेल्या "हबीब बॅंके ला गाशा गुंडाळण्यास सांगितले आहे. दहशतवाद्यांना रसद पुरवणे आणि मनि लांडिं्रग केल्याचा ठपका बॅंकेवर ठेवण्यात आला आहे. हबीब बॅंक पाकिस्तानमधील सर्वात मोठी खासगी बॅंक आहे.