जमात उद दावाच्या पक्षाला मान्यता नाही

Sep 8 2017 6:16PM
इस्लामाबाद ः पाकिस्तानातील निवडणूक आयोग जमात उद दावा या दहशतवादी संघटनेच्या मिल्ली मुस्लिम लीग नावाच्या राजकीय पक्षाला मान्यता देण्यास नकार दिला आहे. मिल्ली मुस्लिम लीगला कोणतीही कायदेशीर मान्यता नसून "एमएमएल ला कोणत्याही चिन्हाचे वाटप करण्यात आलेले नाही, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.