दुसरीच्या विद्यार्थ्याचा शाळेतील स्वच्छतागृहात सापडला मृतदेह

Sep 8 2017 6:45PM
गुडगाव ः गुडगाव येथील रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या स्वच्छतागृहात दुसरीच्या वर्गातील सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. प्रद्युम्न ठाकूर असे त्या मुलाचे नाव आहे. धारदार शस्त्राने त्याची हत्या करण्यात आली. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.