गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास 10 लखांचे बक्षिस

Sep 8 2017 7:13PM
बेंगळुरू ः ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येस 72 तासांचा काळ लोटला असला तरी अद्याप मारेकऱ्यांचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. गौरी लंकेश यांच्या हत्येसंदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती असल्यास पोलिसांना कळविण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे, मारेकऱ्यासंदर्भात माहिती देणाऱ्यास कर्नाटक सरकारने दहा लाखांचे बक्षिस जाहीर केले आहे.