डॉ. मेधा खोलेंवर अदखलपात्र गुन्हा

Sep 9 2017 4:49PM
पुणे : सोवळे मोडल्याप्रकरणी स्वयंपाकीणबाईला कामावरून काढून टाकून मारहाण केल्याप्रकरणी हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांच्याविरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निर्मला यादव (वय-60) यांनी तक्रार दिली आहे.