सोपोरमध्ये चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा

Sep 9 2017 5:15PM
श्रीनगर : उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये सुरक्षा दलाने शनिवारी चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा केला. गुप्तचर यंत्रणांना रेबन-सोपोर भागात दोन ते तीन दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे सुरक्षा दलाच्या जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घालत शोधमोहीम हाती घेतली. दहशतवाद्यांना आपण चहुबाजूने वेढले जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनीही गोळीबार केला. यामध्ये एक दहशतवादी मारला गेला.