लालबागच्या दानपेटीत रद्द झालेल्या 1000 च्या नोटा!

Sep 9 2017 5:26PM
मुंबई ः लागबागच्या चरणी कोट्यवधीचे दान रोख रोकड, सोन्या-चांदीच्या दागिणे स्वरुपात मोठ्या प्रमाणात सर्मपित केले जातात. यंदाही भक्तांनी भरभरून दान दिले. यामध्ये रोख रकमेसह 5.5 किलो सोने आणि 70 किलो चांदीचा सामवेश आहे. मात्र, धक्कादायक म्हणजे, लालबागच्या राजाच्या दानपेटीत चलनातून रद्द झालेल्या 1000 रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्या आहेत. दानपेटी 1000 रुपयांच्या 110 जुन्या नोटा सापडल्या आहेत. या नोटांचे मुल्य 1 लाख 10 हजार रुपये आहे. दैनंदिन व्यवहारातून बाद झालेले चलन पाहून नोटा मोजणारेही काहीसे चक्रावून गेले.