गुडगाव हत्या प्रकरण; मुख्याध्यापक निलंबित

Sep 9 2017 5:48PM
गुडगाव : शाळेच्या आवारातच सात वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर गुडगावमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापकास निलंबित करण्यात आले असून सुरक्षा कर्मचारी वर्गही बदलण्यात आला आहे. तर, या प्रकरणातील आरोपी बस वाहक अशोक कुमार याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. प्रद्युम्न ठाकूर याची परवा सकाळी शाळेच्या स्वच्छतागृहात हत्या झाली होती.