बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी 7 खासदार, 98 आमदार प्राप्तीकर विभागाच्या रडारवर

Sep 11 2017 5:26PM
नवी दिल्ली ः उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीच्या संशयावरून लोकसभेचे 7 खासदार आणि विविध राज्यातील सुमारे 98 आमदार प्राप्तीकर विभागाच्या रडारवर आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. या लोकप्रतिनिधींच्या संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे. या सर्वांची चौकशी सुरू असून आज (मंगळवारी) त्यांच्या नावाची यादी सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.