दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

Sep 11 2017 5:52PM
श्रीनगर ः काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना रविवारी मध्यरात्री चकमकीत कंठस्नान घातले. तर एका दहशतवाद्याला पकडण्यात आले आहे. कुलगाम जिल्ह्यातील खुदवानी भागात काही दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी परिसराला घेराव घालत शोधमोहीम हाती घेतली होती. दहशतवाद्यांना चहुबाजूने वेढले जात असल्याचे कळताच त्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलानेही गोळीबार केला. यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले. तर एकाला जीवंत पकडण्यात यश आले. परवा शोपेन जिल्ह्यात हिज्बुल मुजाहिदीनच्या दोघा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. तर एकाने शरणागती पकडली होती.