लष्कराकडे पुरेशा दारूगोळा साठा : सीतारामन

Sep 12 2017 6:18PM
नवी दिल्ली : संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग)चा लष्कराकडील दारूगोळ्यासंदर्भातील अहवाल फेटाळून लावला आहे. संसदेत सादर केलेल्या अहवालात कॅगने भारतीय लष्कराकडे युद्धासाठी केवळ 20 पुरेल इतकाच दारूगोळा साठा उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. सीतारामन यांनी कॅगच्या अहवालात कोणतेही तथ्य नसून भारतीय लष्कराकडे दारूगोळ्याची कोणतीही कमतरता नाही, असे म्हटले आहे. त्याचवेळी या विषयावर अधिक चर्चा करणेही अनावश्यक असल्याचे म्हटले आहे.