प्रद्युम्न हत्या प्रकरण ; बस वाहकास न्यायालयीन कोठडी

Sep 12 2017 6:36PM
गुडगाव : प्रद्युन्म हत्या प्रकरणातील संशियत बस वाहक अशोक कुमार यास मंगळवारी सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याआधी सुनावलेली तीन दिवसांची पोलिस कोठडी काल संपली. त्यामुळे अशोक कुमार यास काल सोहाना न्यायालयत हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने अशोक कुमार यास 18 सप्टेंबर न्यायालयीन कोठडी सुनावली.