भाजप खासदार संजय काकडेंविरोधात गुन्हा दाखल

Sep 17 2017 5:40PM
पुणे : भाजपचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांच्याविरोधात शनिवारी रात्री साडेनऊ वाजता वारजे पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील खडकवासला येथील न्यू कोपरे गावातील जमीन बनावट कागदपत्रांद्वारे हडप केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जागेच्या मोबदल्यात रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी देण्यात आलेली शासकीय जागा बळकावल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.