पाकिस्तानच्या गोळीबारात दोन नागरिक जखमी

Sep 27 2017 7:41PM
जम्मू ः पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानी सैन्यांकडून सीमेवरील चौक्यांसह नागरी वस्तींना लक्ष्य केले जात आहे. पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील चौक्यांसह डझनभर गावांवर बुधवारी सकाळी पाकिस्तानकडून बेछूट गोळीबारासह उखळी तोफांचा मारा करण्यात आला. यामध्ये दोन नागरीक जखमी झाले. जखमींची ओळख पटली असून शाम अख्तर आणि रझा अहमद अशी त्यांची नावे आहेत.