काबूल हादरले; विमानतळावर रॉकेट हल्ला

Sep 27 2017 7:44PM
काबूल ः अफगाणिस्तानची राजधानी काबूल रॉकेट हल्ल्यांनी हादरून गेली. काबूल येथील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 20 ते 30 रॉकेट डागण्यात आले. या हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून हे विमानतळ तत्काळ खाली करण्यात आले, तसेच सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच, कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. =