नोटाबंदीने आगीत तेल ओतण्याचे काम केले ः यशवंत सिन्हा

Sep 27 2017 7:44PM
नवी दिल्ली ः भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकार आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर जोरदार शरसंधान साधले. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर सातत्याने घसरत असून, आर्थिक मंदीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा काळात नोटाबंदी करून मोदी सरकारने आगीत तेल ओतल्याची खरमरीत टीका सिन्हा यांनी केली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय अर्थव्यवस्था ही झपाट्याने विकसित होणारी असून, जागतिक स्तरावर भारताने विश्वासार्हता निर्माण केली आहे आणि हे कोणीही नाकारू शकत नाही, असे म्हटले आहे.