अर्थव्यवस्थेचे पंख तुटलेत, सीट बेल्ट बांधा : राहुल गांधी

Sep 27 2017 7:46PM
नवी दिल्ली : यशवंत सिन्हा यांच्यापाठोपाठ कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. "मी विमानाचा को-पायलट आणि अर्थमंत्री बोलत आहे. कृपया तुमचे सीटबेल्ट तातडीने बांधा. विमानाचे दोन्ही पंख तुटले आहेत, असे ट्विट करत राहुल गांधी यांनी जेटलींवर जोरदार निशाणा साधला आहे. सिन्हा यांच्यासोबतच यूपीएच्या काळात अर्थमंत्री पदी राहिलेल्या पी. चिदंबरम यांनीही मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. देशाचे नेतृत्व आता तरी अर्थव्यवस्था बुडत असल्याचे मान्य करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.