शिवसेनेने हसू करून घेतले : चंद्रकांत पाटील

Sep 27 2017 7:47PM
कोल्हापूरडी : शिवसेनेने सरकारविरोधात आंदोलन करून स्वतःचेच हसं करून घेतले अहे. त्यामुळे ते सत्तेतून बाहेर पडूच शकत नाही, अशी बोचरी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केली. शिवसनेची खिल्ली उडवतानाच चंद्रकांत पाटील यांनी घरातील भांडणे रस्त्यावर काढण्याची वृत्तीच मुळात चुकीची असून, शिवसेना सत्तेत राहून विरोधकांची भूमिका घेत स्वतःचे नुकसान करत असल्याचे सांगितले.