म्यानमार सीमेवर लष्करी कारवाई; नाग अतिरेक्यांचे तळ उद्‌ध्वस्त

Sep 27 2017 7:49PM
नवी दिल्ली : भारतीय लष्कराने बुधवारी पहाटे म्यानमारच्या सीमेवर मोठी कारवाई केली. या कारवाईत भारतीय लष्कराने नाग अतिरेक्यांचे तळ नेस्तनाबूत केले. यात अनेक नाग अतिरेकी मारले गेले. सुरूवातीला भारतीय लष्कराने म्यानमारच्या सीमेवर सर्जिकल स्ट्राईक केल्याचे सांगितले जात होते. मात्र, लष्कराने सर्जिकल स्ट्राईक नव्हे तर लष्करी कारवाई असल्याचे म्हटले आहे.