भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले

Sep 28 2017 4:50PM
हैदराबाद ः भारतीय हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान गुरूवारी तेलंगणामधील किसारा गावात कोसळले. या विमानाचा वैमानिक सुरक्षित आहे, तसेच कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काल सकाळी पावने बाराच्या सुमारास हा अपघात झाला. हे विमान हकीमपेट विमानतळावरून निघाले होते. वैमानिकाने पैराशूटच्या मदतीने स्वतःचे प्राण वाचविले.