रेल्वेच्या प्रत्येक डब्यात लागणार सीसीटीव्ही

Sep 28 2017 8:33PM
नवी दिल्ली ः आता रेल्वेच्या प्रत्येक डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. इतकेच नव्हे, तर रेल्वे स्टेशन आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मवरदेखील सीसीटीव्हीच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाची करडी नजर असणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले असल्याची माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिली. याबरोबरच, तिकीट तपासणीस यांनी अधिकृत गणवेशातच तिकिटे तपासावीत, अशी सूचनाही गोयल यांनी केली.