जवानाच्या हत्येमागे तय्यबाचा महमूद गट

Sep 28 2017 8:34PM
श्रीनगर ः जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये सुट्टीवर आलेला सीमा सुरक्षा दलाचा जवान मोहम्मद रमीझ पार्रे याच्या हत्येमागे लष्कर ए तय्यबाचा महमूद भाई गट असल्याचे समोर आले आहे. रमीझ पार्रे याची बुधवारी दहशतवाद्यांनी घरात घुसून हत्या केली होती. या हल्ल्यात पार्रे कुटुंबातील चौघे जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रमीझ यांच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.