केंद्र सरकार करणार मेगा भरती

Sep 28 2017 8:34PM
नवी दिल्ली ः केंद्र सरकार लवकरच शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील तब्बल 20 लाख रिकामी पदे भरणार आहे. रेल्वेतच सुमारे 2 लाखांहून अधिक रिकामी पदे भरण्यात येणार आहेत. या मेगा भरतीची सुरुवात केंद्रीय मंत्रालय आणि सार्वजनिक क्षेत्रातील 244 कंपन्यांपासून होण्याची शक्यता आहे. यासाठी केंद्रीय कामगार मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे.