आता ऑनलाइन ऑर्डरनंतर घरपोच इंधन

Sep 28 2017 8:36PM
नवी दिल्ली ः आता इंधनासाठी पेट्रोल पंपावर रांगा लावण्याची गरज नाही. तर, घरपोच इंधन मिळणार आहे. त्यासाठी ऑनलाईन ऑडर्रची सुविधा सरकार उपलब्ध करून देणार आहे. आता लवकरच ई-कॉमर्सच्या संकेतस्थळावर पेट्रोलियम पदार्थ उपलब्ध होतील, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. यासंदर्भातील आवश्यक असलेल्या परवानग्या मिळाल्या असल्याचेही प्रधान यांनी सांगितले.