उत्तर कोरिया उभारणार 47 लाख सैनिकांची फौज

Sep 28 2017 8:37PM
प्योंगयांग ः हायड्रोजन अणुचाचणीनंतर संपूर्ण देशात खळबळ माजविणारा उत्तर कोरिया आता जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांची फौज उभारणार आहे. या सैन्य दलात तब्बल 47 लाख सैनिकांचा समावेश असेल. सैन्यात भरती होण्यासाठी तब्बल 12 लाख उत्तर कोरियाई नागरिक स्वयंस्फूर्तीने पुढे आले आहेत. यामध्ये महिला आणि विद्यार्थी, तसेच श्रमिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे वृत्त आहे.