गायिका पुष्पा पागधरे यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

Sep 28 2017 8:37PM
मुंबई, (प्रतिनिधी) ः नाना पाटेकर यांच्या अंकुश या चित्रपटातील इतनी शक्ती हमे दे ना दाता.. या गाण्यामुळे घराघरात पोचलेल्या जुन्या पिढीतील गायिका पुष्पा पागधरे यांना राज्य सरकारचा यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी या पुरस्काराची घोषणा केली.