जपानमध्ये मुदतपूर्व निवडणुका

Sep 28 2017 8:38PM
टोकियो ः जपानमध्ये ऑक्टोबरमध्ये मुदतपूर्व निवडणुका होणार आहेत. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी संसदेचे कनिष्ठ सभागृह बरखास्त केले. यासंदर्भातील घोषणा सभागृहाचे अध्यक्ष ताडामोरी ओशिमा यांनी केली. उजव्या विचारसरणीचे आबे हे सत्तारूढ लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे आहेत. त्यांचा पक्ष 2012 मध्ये सत्तेवर आला. आबे यांच्यासमोर टोकिओच्या गर्व्हनर युरिको कोइके यांच्या नव्या पक्षाचे आव्हान असेल. युरिको यांनी अलिकडेच "पार्टी ऑफ होप नावाचा पक्ष स्थापन केला आहे. उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर आबे यांना मतदारांचा नव्याने कौल हवा आहे.