चिरीमिरी हा सहकार क्षेत्राला लागलेला कलंक : सुभाष देशमुख

Sep 28 2017 8:39PM
पुणे : चिरीमिरी हा गेल्या अनेक वर्षांपासून सहकार क्षेत्राला लागलेला कलंक आहे. हा कलंक दूर करून पारदर्शी कारभाराच्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. या क्षेत्रात कोणत्याही कामाची फाईल पुढे सरकावण्यासाठी कोणाला चिरीमिरी देण्याची वेळ येणार नाही, याबाबत उपाय योजना सुरू असल्याचे मत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी गुरुवारी व्यक्त केले.