तरुण तेजपालवर आरोप निश्चित

Sep 28 2017 8:40PM
पणजी ः "तहलका चा माजी संपादक तरुण तेजपालविरोधात उत्तर गोव्यातील मासुपा न्यायालयाने गुरुवारी आरोप निश्चित केले. सहकारी तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. आरोपपत्राची पत्राची प्रत तेजपालला दिली आहे. तेजपालच्या वकिलांनी न्यायालयाकडे आणखी एका महिन्याचा कालावधी मागितला होता. मात्र, न्यायालयाने तो देण्यास नकार दिला. या प्रकरणी पुढील सुनावणी 21 नोव्हेंबरला होणार आहे. दरम्यान, कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला स्थगिती देण्याची विनंती तेजपालने उच्च न्यायालयात केली होती. कनिष्ठ न्यायालयताील आरोप निश्चितीवरही स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने तेजपालची विनंती फेटाळून लावली होती.