मुंबईत रेल्वे पुलावर चेंगरा चेंगरी; 22 ठार, 30 जखमी

Sep 29 2017 5:59PM
मुंबई : मुंबईतील परळ-एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावर शुक्रवारी मृत्यूने अक्षरशः तांडव केले. रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 22 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 30 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 13 पुरूष, 8 महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. तर, मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने पाच लाखांची मदत जाहीर केली. गंभीर जखमींना 1 लाखांची तर किरकोळ जखमींना 50 हजारांची मदत दिली जाणार आहे. तसेच, जखमींवरील उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार आहे. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. दुसरीकडे, विरोधकांनी रेल्वे मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.