राजस्थानमध्ये महिलेवर 23 जणांचा बलात्कार

Sep 29 2017 6:34PM
जयपूर : राजस्थानच्या बिकानेरमध्ये एका महिलेवर 23 जणांना सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पिडीत महिला नवी दिल्लीची रहिवासी आहे. ती 25 सप्टेंबर रोजी काही कामानिमित्त बिकानेरच्या रिदमलसार पुरोहितन परिसरात आली होती. परतत असताना दोघांनी तिला मोटारीत लिफ्ट दिली. थोड्या अंतरावर गेल्यावर त्यांनी तिला खेचत रस्त्याच्या कडेला नेले आणि तिच्यावर सामुहिक बलात्कार केला.