विद्या बालन मोटार अपघातातून बचावली

Sep 29 2017 6:35PM
मुंबई : अभिनेत्री विद्या बालन एका मोटार अपघातातून थोडक्यात बचावली. सुदैवाने, या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही., पण तिच्या मोटारीचे बरेच नुकसान झाले. अपघात कसा झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. विद्या सध्या तिच्या आगामी "तुम्हारी सुलू चित्रपटाच्या तयारी व्यस्त आहे. या चित्रपटात ती "नाईट आरजे ची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 24 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.