उद्धव यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत ः राणे

Sep 29 2017 6:36PM
डोंबिवली : कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार शरसंधान साधले आहे. डोंबिवलीतील कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव यांचा एकेरी उल्लेख करत, माझ्याकडे सगळ्यांच्या कुंडल्या आहेत, बोलायला लावू नका नाहीतर पळता भुई थोडी होईल, असा इशारा राणे यांनी दिला. उद्धव ठाकरेंमुळेच आपण शिवसेनेतून बाहेर पडलो. मी साहेबांना त्रास दिला नाही. साहेबांना सांगून बाहेर पडलो. उलट, बाळासाहबांना जेवढा त्रास उद्धव ठाकरे यांनी दिला तेवढा कोणत्याही मुलाने आपल्या वडिलांना दिला नसेल. मी याला साक्षीदार असल्याचेही राणे म्हणाले.