विमान प्रवास महागणार

Oct 2 2017 4:24PM
नवी दिल्ली : पेट्रोलियम मंत्रालयाने हवाई इंधनाच्या दरात 6 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे लवकरच हवाई प्रवास महागण्याची शक्यता आहे. विमानाच्या तिकीट दरांमध्ये 10 ते 15 टक्क्यांनी वाढ करण्याचा विचार विमान कंपन्या करत आहेत. दुसरीकडे, घरगुती वापराच्या सिलेंडरदरात दीड रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता अनुदानित सिलेंडर महागला आहे.