पाकिस्तानच्या गोळीबारात दोन मुलांचा मृत्यू; 11 जण जखमी

Oct 2 2017 4:41PM
श्रीनगर : पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेलगत पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरू आहे. यात एका मुलाचा आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, 11 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात इफराज अहमद (वय 9), शमीर अख्तर (वय 15) यांचा मृत्यू झाला आहे.