घुसखोरीचा डाव उधळला; तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

Oct 2 2017 4:55PM
श्रीनगर : पाकिस्तानच्या कुरखोडी सुरूच आहेत. गोळीबाराच्या आड घुसखोरी करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला. कुपवाडा आणि बारामुला जिल्ह्यातील उरी भागात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. यात तिघा दहशतवाद्यांना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी कंठस्नान घातले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसामग्री जप्त करण्यात आली आहे.