दिनकरन यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा

Oct 2 2017 8:13PM
नवी दिल्ली : "नीट परीक्षेवरून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करणारे टी.टी.व्ही. दिनकरन यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनकरन यांच्या समर्थकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात पत्रकाचे वाटप केले होते. तामिळनाडूतील "अण्णा द्रमूकचे बंडखोर नेते आणि शशिकला यांचे पुतणे दिनकरन यांनी "नीट परीक्षेवरून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली होती. केआरएस सरवानन यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून दिनकरन यांच्यासह 36 जणांविरोधात त्यांनी तक्रार दाखल केली. मोदी आणि पलानीस्वामी यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.